रवी संभाजी लहाने यांचे अल्पशा आजाराने निधन

छत्रपती संभाजीनगर : येथील रा. जे – सेक्टर मुकुंदवाडी , छ.संभाजीनगर
रवी संभाजी लहाने (45) यांचे 10 जानेवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत उद्या ११ जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल.
रवी संभाजी लहाने हे मागील काही दिवसांपासून आजारी होते.
अनेकांनी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती. पण कुटूंबियांनी सर्व शर्थिचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात यश आले नाही. रवी लहाने हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे हाेते. त्यांच्या अल्प आयुष्यात त्यांनी खूप चांगली माणसे जाेडून ठेवली होती. त्यांच्या अकाली निधनाने कुटूंबिय आणि मित्र परिवारासह प्रत्येकालाच मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगी 2 मुले,बहिणी असा परिवार आहे. रवी लहाने यांच्या अकाली निधनाने जो धक्का कुटूंबियांना बसला आहे त्यांना या संकटातून सावरण्यासाठी शक्ती मिळो अशी ‘वृत्तपर्व’कडून प्रार्थना करण्यात येत आहे.
