ईमानदारी पडली महागात शाहरुख खानच्या टीमवर या क्रिकेटपटूच्या पत्नीने व्यक्त केला असा राग

मुंबई : आयपीएल लिलावात काेलकाता नाईट रायडर्सने अनेक बलाढ्य खेळाडूंना विकत घेतले, पण काही खेळाडू असे हाेते, जे बराच काळ त्यांच्यासाेबत हाेते, पण आता ते इतर संघात गेले आहेत. असाच एक खेळाडू म्हणजे नितीश राणा, ज्याच्या पत्नीला याचा राग आला आहे.
नितीश राणाची पत्नी साची मारवाह हिने साेशल मीडियावर काेलकाता नाईट रायडर्स विराेधात असे लिहिले जे केकेआरच्या चाहत्यांना आवडणार नाही. काेलकाताच्या नितीश राणाला न खरेदी केल्याबद्दल साची मारवाहने कमालीची निराशा व्यक्त केली आहे.
नितीश राणाची पत्नी साचीने केकेआर विराेधात ट्विट केले, ’लाॅयल्टी महाग आहे, प्रत्येकाला परवडत नाही.
नितीश राणा गेल्या 7 वर्षांपासून केकेआरचा भाग हाेता, पण यावेळी ्रँचायजीने त्याच्यावर बाेली लावली नाही. नितीश राणाची मूळ किंमत 1.5 काेटी रुपये हाेती आणि यावेळी चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर बाेली लावली हाेती. पण शेवटी राजस्थान राॅयल्सने विजय मिळवला आणि त्याला 4 काेटी 20 लाख रुपयांना विकत घेतले.
नितीश राणाने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 2018 मध्ये केकेआरमध्ये सामील झाला. नितीश राणाला विकत घेतले नाही, कारण ताे गेल्या माेसमात फक्त 2 सामने खेळू शकला हाेता. त्याच्या बॅटमधून फक्त 42 धावा आल्या.
नितीश राणा केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बसत नव्हता, म्हणून त्यांनी नितीशला जाऊ दिले. बरं, आता नितीश राणा राजस्थान राॅयल्स संघात सामील झाला आहे, जिथे त्याला मधल्या \ळीत माेठी जबाबदारी मिळू शकते.
नितीश राणाने आयपीएलमधील 107 सामन्यात 28.65 च्या सरासरीने 2636 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 135 पेक्षा जास्त आहे. नितीश राणा सुद्धा चांगला पार्ट टाइम गाेलंदाज आहे. त्याचा इकाॅनाॅमी रेट चांगला आहे, ज्याचा उपयाेग राजस्थान संघ करू शकताे.