निजाम सरकारने जप्त केलेल्या ऋषी चरित्र प्रकाशचे डॉ.महेंद्र गौशाल यांच्या हस्ते प्रकाशन

हैद्राबाद – आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या काळात लढा देणारे स्वातंत्र्य सैनिक पंडित गंगाराम वानप्रस्थी यांनी दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या ऋषी चरित्र प्रकाश हे पुस्तक तत्कालीन हैद्राबादच्या निजाम सरकारने जप्त केले होते.
आर्य समाज आणि दयानंद सरस्वती यांचे जीवनकार्य यावर प्रकाश टाकणारे ऋषी चरित्र प्रकाश या पुस्तकाचे पुर्नमुद्रण स्वातंत्र्यसेनानी पंडित गंगाराम स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन बीड शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुख्य वक्ता डॉ.विजयवीर विद्यालंकार, प्रमुख पाहुणे डॉ.विद्यानंद, व तेलगु अनुवादक भरत मुनी वानप्रस्थी हे उपस्थित होते.
कार्यक्रमात वक्त्यांनी गंगाराम वानप्रस्थी यांनी लिहिलेल्या या पुस्तक व त्यांच्या जीवनावर विस्ताराने प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की महर्षि दयानंद सरस्वती यांच्या जीवनाने प्रभावित होवून पंडित गंगाराम यांनी हे पुस्तक लिहिले.
मुख्यपणे हे पुस्तक तरुण व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याचा संदेश देत आहे, त्यामुळे याला लक्षात घेवून ंऋषि चरित्र प्रकाशाचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले जाईल. प्रत्येक शाळा व महाविद्यालयांना हे पुस्तक पाठविले जाईल तसेच या पुस्तकाचे 16 भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार आहे. सध्या या पुस्तकांचे तेलुगू, मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत अनुवाद करणे सुरु आहे आणि लवकरच अन्य भाषांमध्येही आणि विदेशी भाषांमध्ये याचा अनुवाद केला जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिकांत भारतीनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सुधा ठाकूर यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रदिप जाजू, डॉ.प्रतापरुद्र, डॉ.धर्मतेजा, सुधा ठाकूर,रामचंद्र राजू, धमेंद्र जिज्ञासू, अशोक श्रीवास्तव, नरसिम्हा आर्य, शिवाजी, अग्निमुनी वानप्रस्थी, ओमप्रकाश आर्य, के राजन्ना, प्रमोद गौशाल, राजेंद्र, प्रेमचंद मुनोत, भिक्षापति, मिरा,
देवश्री, दिनेश सिंह, ऋषी राम, शोभा दुबे, मनोहर सिंह, विभा भारती, सुनील सिंह, राणधीर सिंह, ममता धर्मपाल, सत्यपाल, रामना मूर्ती, शिवचंद, डतत आर्य, आत्माराम, विजय राम, मधुराम,विनोद चंद्र, सुचित्रा चंद्र, विजयवीर, कृष्णा रेड्डी, सतीश जाजू, अभिराम, आनंदिता, अमर आर्य, चंद्रडू, भक्त राम,पं.प्रियदत्त शास्त्री, प्राचार्य अरुंधती कुलकर्णी, डैनी कुमार आझाद, डॉ.प्रेमलता श्रीवास्तव आदी. उपस्थित होते.