12 जानेवारीस सर्वशाखीय ब्राह्मण समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा
कण्व ब्राह्मण समाजाच्या वतीने 17 व्या राज्यस्तरीय सर्वशाखीय ब्राह्मण समाजाच्या वधू-वर मेळाव्याचे आयोजन
दाते पंचांगकर्ते मोहन दाते करणार मार्गदर्शन
दि 12 जाने रोजी सकाळी 10.30 वा. ते 2 दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पैठणगेट छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात दाते पंचांगकर्ते मा मोहन दाते हे मंगळ, नाडीदोष, सगोत्रि विवाह आदीसह बदलत्या वैवाहिक समस्या व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यात 200 पेक्षा जास्त उपवर मुलामुलींची माहिती असलेली वधू-वर पुस्तिकासुध्दा प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तिकेत संपूर्ण महाराष्ट्रातील मुलामुलींची माहिती असणार आहॆ. तसेच त्या दिवशी सुध्धा वधु-वर नोंदणी केली जाणार असून त्याची सुध्धा पुस्तिका मेळाव्यानंतर लगेच प्रसिद्ध केली जाणार आहॆ. कार्यक्रमात प्रोजेक्टरच्या साहाय्याने मुला-मुलींचा परिचय करून दिला जाणार आहे. मागील वर्षी झालेल्या मेळाव्यातील 75 पेक्षा जास्त मुलामुलींची लग्ने जुळली असून यावर्षी या मेळाव्याद्वारे किमान 100 लग्ने जुळन्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे. मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 9822764399 / 9923141171 वर किंवा कण्व भवन, 12 वी योजना, सिडको, शिवाजीनगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सीएस लक्ष्मीकांत जयपूरकर, कार्यक्रम प्रमुख अशोक भाले यांनी केले आहे.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष उदय मानवतकर, सचिव धीरज देशपांडे, सहसचिव सौ विजयालक्ष्मी भाले, कोषाध्यक्ष धनंजय सिमन्त, जनसंपर्क प्रमुख प्रफुल्ल कुलकर्णी, सौ संगीता कागबटे, सुरेंद्र आनंदगावकर, प्रवीण शिरोडकर, अविनाश आडसकर, महेंद्र मानवतकर, तुळशीदास जयपूरकर, भालचंद्र पिंपळवाडकर, सचिन दैठनकर, सौ सविता आचार्य, सौ अलका भाले, सौ ज्योती कुलकर्णी व अनिल दिन्नापुरकर आदी प्रयत्न करत आहेत.