माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीचे दिल्लीत स्मारक उभारले जाणार

नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दिल्लीतील राष्ट्रीय स्मृति कॉम्प्लेक्समध्ये स्मारक उभारले जाणार असल्याची माहिती त्यांची कन्या शर्मिष्ठ मुखर्जीनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून दिली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जीनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटचा एक फ ोटो व पत्र एक्स या सोशल मीडीयावर पोस्ट करत त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या पुढाकारासाठी आभारी आहे. मला याची बिलकुल आशा नव्हती.
शर्मिष्ठांनी लिहिले की बाबा सांगत असत की राजकिय सन्मान कधीही मागितला नाही पाहिजे, तर तो दिला गेला पाहिजे. पंतप्रधानांनी माझ्या वडिलांच्या आठवणी बाबात जो सन्मान देण्याचा विचार केला आहे यामुळे बाबाना काही फ रक पडणार नाही कारण सन्मान व अपमानाच्या ते पुढे गेले आहेत. परंतु त्यांच्या मुलीला जो आनंद झाला तो शब्दात सांगू शकत नाही.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती कॉम्प्लेक्स ही जागा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या स्मारकासाठी राखीव जागा असून हे ठिकाण यमुना नदीच्या काठावर आहे. 2013 मध्ये केंद्रिय मंत्रीमंडळाने राजघाटाजवळील या जागेवर राष्ट्रीय स्मृती स्थळ बनविण्यास मंजूरी दिली होती.
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या निधनानंतर दहा वर्षाने भाजप सरकारने त्यांचे स्मृतिस्थळ निर्माण करण्याचा निर्णय घेतला व याला एकता स्थळ असे नाव दिले. तर याच परिसरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपीयींचेही स्मृतीस्थळ सदैव अटल आहे.
Thanks for the photo – The Times of India

