बीड शहरात सानप यांच्या कारवाईने बुलेटस्वारांचे दणाणले धाबे…

दणाणलेशहर प्रतिनिधी : बीड शहरामध्ये वाहतुक पोलिस शाखेने मोठया आवाजाने चालणार्या जवळपास 150 बुलटेचे सायलेन्सर काढून ते रोडरोलरखाली चिमटून नष्ट केले.
शहरात टवाळखोरी करणार्या आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणार्या बुलेटचालकांवर वाहतूक पोलीस शाखेने कठोर कारवाई करत ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
या कारवाईत, वाहतूक शाखेने अंदाजे 150 इतक्या मोठ्या प्रमाणात बुलेटचे मोठ्या आवाजाचे सायलेन्सर काढून त्यावर रोड रोलर चालवलेले आहे. या कार्यवाहीमुळे टवाळखोरी करणार्यांचे धाबे दणाणले असून या कामगिरीची जिल्हाभर चर्चा होत आहे.मोठ्या आवाजाचे सायलेन्सर हे ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.
त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेने हा धडक निर्णय घेतला. ही कारवाई बीड जिल्ह्यातील केज, आंबेजोगाई, गेवराई आणि इतर ठिकाणी करण्यात आली आहे.ही मोहीम डीवायएसपी विश्वंभर गोल्डे, पोलीस निरीक्षक सानप, आणि वाहतूक पोलीस शाखेच्या इतर कर्मचार्यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली.
या उपक्रमामुळे वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि नागरिकांकडूनही या उपक्रमाला पाठिंबा मिळत आहे.यापूर्वी जिल्हाभरातील वेगवेगळ्या शहरात मोहीम राबवून पोलीस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.