जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात कसोटीत सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज

सीडनी – भारत व ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात सध्या सुरु असलेल्या गावसकर-बोर्डर कसोटी मालिकेच्या दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जयप्रीत बुमराहने एकापोठा एक विक्रमांची नोंद केली असून त्यांने आपल्याच देशाचा फि रकी गोलंदाज बिशनसिंग बेदींचा विक्रमही मोडीत काढत ऑस्ट्रेलियात सर्वाधिक गडी बाद करण्याचा नवीन विक्रम स्थापित केला.
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असून येथे पाच कसोटी सामन्यांची गावसकर-बोर्डर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना सीडनी येथे खेळला जात असून या दौर्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एकमागोमाग एक विक्रम स्थापित केले आहेत.
जसप्रीत बुमराहने सीडनी येथे सुरु असलेल्या शेवटच्या सामन्यात पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाला बाद केले तर दुसर्या दिवशी मार्नस लबूर्शनला बाद करुन तो भारताकडून ऑस्ट्रेलियात सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. त्यांने आता पर्यंत ऑस्ट्रेलियात एकूण 9 डावांमध्ये 12.50 च्या सरासरीने 32 गडी बाद केले व आपल्याच देशाचा महान फि रकी गोलंदाज बिशनसिंग बेदींचा विक्रम मोडला आहे.
भारताचा फि रकी गोलंदाज बिशनसिंग बेदींनी 1977-78 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात 10 डावात 23.86 च्या सरासरीने 31 गडी बाद केले होते व ते आतापर्यंत ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज ठरले होते. शनिवारी दि.4 जानेवारीला जसप्रीत बुमराहने हा विक्रम मोडला व 32 गडी बाद करत नवीन विक्रम स्थापित केला.
जसप्रीत बुमराह आणि बेदी व्यतिरीक्त ऑस्ट्रेलियात 25 पेक्षा जास्त गडी बाद करणार्यांच्या यादीमध्ये 1977-78 मध्ये बी.एस.चंद्रशेखर यांनी 28 गडी बाद केले तर त्यांच्या आधी 1967 -68 मधील दौर्यात ई.ए.एस.प्रसन्ना यांनी 25 गडी बाद केले होते. त्यानंतर भारताचा महान मध्यमगती गोलंदाज कपिल देवने 1991-92 च्या दौर्यात 25 गडी बाद केले होते.

thanks for photo – wallpaperaccess.com