विनोद कांबळी राहत घर गमावणारं!

मुंबई : भारतीय संघातील डावखुरा धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख होती असा विनोद कांबळी सध्या आजारी आहे आणि त्याला गुरुवारी रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला असला तरी त्यांच्या जीवनातील संघर्ष मात्र अजूनही कमी झालेला नाही असच दिसून येत आहे, त्याच कारणही तसच आहे कारण ते म्हणजे घराचा मेंटनसचार्ज न भरल्याने त्याला हे राहत घर सोडावल लागेल की काय असा यक्ष प्रश्न समोर आला असून कोणी तरी मदतीला धावून येईल अशी आशा आता लागून राहिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी विनोद कांबळीची प्रकृती खालावली असल्याने त्याला ठाणे येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता विनोद कांबळी यांची प्रकृती ठीक असून त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समोर आली आहे. असं असल तरी घरी येताच विनोद कांबळीला नव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यावर राहत घर गमवण्याची वेळ आली आहे.
विनोद कांबळी जास्त काही कमवत नसला तरी BCCI ची 30 हजारची पेन्शन त्याला मिळते. त्यातही मुलांचे शिक्षण स्वतःच आजारपण आणि आता राहत्या घराचा आव्हानात्मक प्रश्न विनोद कांबळी समोर येऊन ठेपला आहे. विनोद कांबळीच वांद्रे येथील घरावर कर्ज नसल तरी त्या घराचा मेन्टेनस त्याने थकवला आहे. हा मेन्टेनस त्याने भरला नाही तर त्याला राहत घर सोडावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. विनोद कांबळी आता घर वाचवण्यासाठी नेमक काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
