कला-संस्कृती

डॉ.श्रीकांत तापीकर संपादीत गंधार कविता संग्रहाचे प्रकाशन

पुणे – गंधार सारख्या कविता संग्रहाचे प्रकाशन होणे गरजेचे असून नवोदित कविना अशामुळे व्यासपिठ मिळते आणि त्यांच्या प्रतिभा समाजा समोर येत असतात आणि डॉ.श्रीकांत तापीकरांचे हे कार्य गौरवास्पद आहे असे प्रतिपाद प्रसिध्द कवि चव्हाण यांनी केले.
पुण्यातील नवी पेठ भागत असलेल्या निवारा संस्थेच्या सभागृहात आयोजीत कार्यक्रमात डॉ.श्रीकांत तापीकर संपादीत गंधार या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उर्दू भाषा प्रचारक अतिक शेख, अध्यक्ष चव्हाण, वसुंधरा परिवाराचे प्रमुख धनंजय भोसले उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, डॉ.श्रीकांत तापीकर यांनी विविध विषयावर लेखन केले आहे. ते नवोदीत कविसांठी कवितांचे संपाद करतात. गंधार कविता संग्रहाचे प्रकाशन व्हायला हवे आहे. मराठीला नुकतेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून मराठी भाषेत साहित्य निर्माण होणे अजूनही काळाची गरज आहे. डॉ.तापीकर यांनी या कवितांचे उत्कृष्ट संपाद केले आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.
यावेळी उर्दू भाषेचे प्रसारक अतिक शेख म्हणाले की तापीकर यांनी 2011 ते 2018 या कालावधीत दहा कविता संग्रहाचे संपादन केले आहे आणि त्याचे प्रकाशनही केले आहे. तसेच विविध विषयांवर 50 हून अधिक पुस्तके लिहिली आहे. त्यांनी नवकविना व्यासपीठ मिळून दिले आहे ही फ ार मोठी गोष्ट आहे. ते नवकविसांठी सातत्याने काम करत असतात. त्यांच्या या कविता संग्रहासाठी त्यांचे अभिनंदन करतो.
पुढे ते म्हणाले की तापीकर हे चित्रपट अभ्यासक आहे त्यांनी सुप्रसिध्द दिग्दर्शक बी.आर.इशारा तसेच हिंदी गीतकार सुधाकर शर्मा यांचे चरित्र लिहिली आहेत. त्यांचा अनेक दिग्गज कलाकारां बरोबर परिचय आहे. गंधार सारख्या कव्यासंग्रहाचे त्यांनी संपादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
यावेळी गंधार काव्यसंग्रहाचे संपादन करणारे डॉ.श्रीकांत तापीकर यांनी आपल् या संबोधनात म्हटले की, नवरचनाकारांनी चार भिंतीच्या बाहेर यावे आणि काव्यात्मक जाण वाढविण्यासाठी विविध कविंचे काव्यसंग्रहाचे वाचन करणे गरजेचे आहे, उदा.बा.भ.बोरकर,मंगेश पाडगांवकर, विं.दा.करंदीकर, वसंत बापट, गुरु ठाकूर, सुधीर मोघे, अरुण म्हात्रे इत्यादी व त्यांचे काव्य समजून घ्यायलाही हवेत. त्याच बरोबर उर्दू भाषेतील नामवंतांच्या कविताही वाचयला हव्यात ज्यात मिर्झा गालिब, मिर तस्मीर, मिरा इकबाल, शाहिर साहिल हसरत जयपुरी, कवि शैलेद्र यांच्या कविताही वाचल्या पाहिजेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जुईली कुलकर्णी यांनी केले.

याकार्यक्रमात गंधार काव्यसंग्रहातील सर्व नवोदित कवी, काव्यचाहते आणि रसिक प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी सर्वांच स्वागत करतण्यात आले.

गंधार काव्य संग्राहामध्ये कवि मेधा देव यांच्या किमया, अस्तित्व, रणांगण, मौज, मुख्याध्यापिका, तर सौ.निर्मला केतकर यांच्या वेदना स्त्री मनाची, कृष्णसखा, सप्तस्वर-सप्तरंग, पारिजातक, गांधार. यांच्या कविता तसेच मनीषा भोसले यांच्या रंग या नभात, चांदवेडी,फ ार काही नाही, पाऊस मातीत जन्म रुजाया यांच्या कविता आहेत.
या काव्यसंग्रहात राधा कुलकर्णी यांच्या ओळख, ध्यास, आनंद आणि जुईली कुलकर्णी यांच्या नव्याने, वाट तसेच सौ.ज्योती वाघ यांच्या मैत्री, डाव नियतीचा, प्रेम, जीवन,अपेक्षा भंग या काव्यांचा समावेश आहे.
तसेच सहदेव भवाळ यांच्या वारा, पंख तुझ्या स्वप्नांचे, प्रश्नचिन्ह, ये एकाकी ज्योती आणि नसीब यांच्या पावसाळी, ती, तिसरा चंद्र, चांदवा, चालूया थोडे आपण दोघे, आस, व्यथा, उत्तम, ईच्छा आणि सल्ला या काव्यांचाही समावेश आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button