एमएचटी-सीईटीच्या ऑनलाइन अर्जांसाठी 15 फे ब्रुवारीपर्यंत संधी

पुणे – व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र आणि अभियंत्रीकी तंत्रज्ञानासह विविध 19 क्षेत्रातील प्रवेशासाठी होणार्या एमएचटी -सीईटी पात्रता परिक्षेसाठी आयोजीत करण्यात येणार्या परीक्षांचे वेळापत्रक जाहिर झाले असून या परीक्षांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची 15 फे ब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे.
महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणार्या अभियंत्रीकी क्षेत्रातील प्रवेश, औषधनिर्माणशास्त्र,कृषी अभ्यासक्रमांसाठी आणि याच बरोबर विविध 19 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. मार्च – 2025 पासून या प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत व त्याच्या नोंदणीसाठी टप्प्या टप्प्याने अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याच्या तारखा घोषीत केल्या जात आहेत. सध्या व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी, शिक्षणशास्त्र शारिरीक, शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी, तीन वर्ष विधी अभ्यासक्रम यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
सीईटी सेलच्या नियोजनानुसार अभियंत्रीकी तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र,कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी 9 ते 27 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे.