अर्थ-उद्योगआरोग्यविज्ञान-तंत्रज्ञान

ओयासिस ऑर्गेनिक या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून आयुब पठाण यांची नियुक्ती

जनतेचे आरोग्य अबाधीत रहावे म्हणून ऑर्गेनिक भाजीपाला शहर वासीयांसाठी उपलब्ध करून देण्यावर भर देणार

महेश विसपुते : छत्रपती संभाजीनगर
१० हजार मेट्रीक टन महिन्याला उत्पादन असलेल्या ओयासिस ऑर्गेनिक या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या विविध संस्थांचे पद भूषवणाऱ्या आयुब पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार या प्रश्नावर आयुब पठाण सर म्हणाले की, शहरातील सर्व मॉल्सच्या माध्यमातून जनसमान्याच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ऑर्गेनिक भाजीपाला िवतरीत केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य अबाधीत राहणार आहे. कुठल्याही रोगांना प्रतिकार करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले जातील खर तर शहरवासीयासाठी नव्या वर्षाच्या दृष्टीकोनातून हे सकारात्मक पाऊलच म्हटले पाहिजे असे आयुब पठाण यांनी सांगितले.

दुर्गंधी येणाऱ्या कचऱ्यांपासून कंपोष्ट खत तयार होईल; दुर्गंधीही नष्ट होईल

आयुब पठाण म्हणाले की, शहरात जागोजागी कचरा साचला जात आहे. लोक नाक दाबून संकटातून मार्ग काढत आहेत. मात्र या संकटावर बेस्ट बायोलॉजिकल कल्चर पावडर खरोखरच वरदान ठरणार आहे. कचरा निर्मूलन करण्यासाठी ओयासिस ऑर्गेनिक कडे बायो ऑक्सी नावाचं एक बेस्ट बायोलॉजिकल कल्चर पावडर फॉर्ममध्येआहे. या कल्चरमुळे दुसऱ्याचा येणारा दुर्गंध नष्ट होतो आणि त्या कचऱ्याचं कंपोस्ट मध्ये रूपांतर होते. एक किलोचा पॅक मध्ये जवळजवळ आठशे ते हजार किलो कचरा निर्मूलन होऊ शकतो. म्हणजेच जवळजवळ एक टन कचरा च निर्मूलन होऊ शकतं.

या पावडरचा उपयोग सार्वजनिक शौचालय नाल्या तसेच बायोलॉजिकल जो काही कचरा आहे महानगरपालिकेचा त्याचे निर्मूलन होतं.नाल्यांमध्ये येणारी दुर्गंधीही रहात नाही, तीन तासांमध्ये कितीही घाण असलेला वास कमी होतो.आणि नाल्यामध्ये खाली राहिलेला जो कचरा आहे त्याचं रूपांतर खतामध्ये होऊन नाल्याही स्वच्छ होतात.वापरण्याची पद्धत 40 लिटर पाण्यामध्ये एक किलो पावडर चांगलं ढवळून घेणे व निवडक भागावर अशाप्रकारे पसरवणे जेणेकरून संपूर्णपणे ओले झाले पाहिजे. याच्या मिश्रणाचा उपयोग शेतकरी फवारणीसाठी ही करू शकतो.
याचा घरगुती वारही चांगल्य ा प्रकारे होऊ शकतो. तुम्ही आल्या वॉर्डातील कचऱ्यावर औषध फवारणी केल्यास छान कंपोस्ट खत तयार होते या खताचा उपयोग बागेतील झाडांसाठी, परसबागेसाठीही छान पैकी करता येऊ शकतो.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button