विशेष

असा झाला ग्रेगेरीयन कॅलेंडरचा जन्म

मित्रानो आपण जानेवारी पासून इंग्रजी नववर्ष साजरा करतोत परंतु तुम्हांला या नववर्षाच्या दिनदर्शकाची कहाणी माहिती आहे का नसेल माहिती तर चला आपण या कॅलेंडरची माहिती या लेखात करुन घेवू या.
जगभरामध्ये विविध पाच संस्कृती अस्तित्वात असताना त्यांची स्वतःची कालगणाना होती उदा. भारतात वापरली जाते ती विक्रमसंवत आणि शालीवाहन कालगणना. तशीच युरोपमध्ये आता संपूर्ण जगात वापरली जाते ती ग्रेगेरियन कालगणना.
या कालगणेचा इतिहास खूप रोचक व तितकाच विस्तारणीय आहे. साधारणतः युरोपमध्ये इ.स.पूर्वमध्ये कालगणना सुरु झाली ती प्रथम बनवली रोमन सम्राट रोम्युलसने जे कॅलेंडर बनविले होते ते दहा महिन्याचे होते आणि त्यानंतर सम्राट पोम्पीलसने यात जानेवारी आणि फे ब्रुवारी हे दोन महिने जोडले व ते बारा महिन्याचे कॅलेंडर केले.
या कॅलेंडरमध्ये पाचव्या महिन्याचे नाव हे क्विटिलस होते आणि याच महिन्यात महान सम्राट जुलियस सीजरचा जन्म झाला त्यामुळे या महिन्याचे नाव बदलून जुला ठेवले गेले जे पुढे जुलै असे झाले.
जुलियस सीजरनंतर आक्टेबियन हा रोमनचा सम्राट बनला त्याच्या कार्याची दखल घेवून त्याला इंपेरेटर आणि ऑगस्टस ही उपाधी दिली गेली. त्याच्या काळापर्यंत कॅलेंडरमधील आठव्या महिन्याचे नाव सॅबिस्टालिस होते परंतु त्याच्या आदेशानुसार या महिन्याचे नाव बदलून ऑगस्टस आक्टेविनय होते पुढे जे ऑगस्टस ठेवण्यात आले आणि त्याचा उल्लेख ऑगस्ट झाला.
आक्टेबियन यांच्या काळात सातव्या महिन्याचे 31 आणि आठव्या महिन्याचे 30 दिवस होते. सीजरच्या नावावरुन जुलै महिना पडला व त्याचे दिवस हे ऑगस्ट महिन्यापेक्षा एकने जास्त होता त्यामुळे या सम्राटाने फे ब्रुवारी महिन्यातील एक दिवस कमी करुन तो ऑगस्ट महिन्यात घेतला. त्यामुळे फे ब्रुवारी महिना 28 दिवसांचा झाला.
आज आपण जी ग्रेगेरीयन कालगणाना वापरतोत ती आठव्या पोप ग्रेगेरीयनने सन 1582 मध्ये तयार केलेली आहे.
ही कालगणाना त्यांच्या आदेशानुसार 2 मार्च 1582 पासून लागू करण्यात आली परंतु यातही अनेक दोष राहिले होते त्यामुळे पुढे 1752 मध्ये यात सुधारणा करण्यात आली. त्यावेळी सप्टेंबर महिन्यात 2 तारखेनंतर थेट 14 तारखीच तरतुद केली गेली व याला संतुलीत केले गेले. त्यावेळी या सप्टेंबर महिन्यात एकूण 19 दिवसच होते.
पोप ग्रेगेरीयन याने तयार केलेल्या कँलेडरमध्ये लिप वर्ष सामील केले असून जे दर तीन वर्षानंतर येत असते. ज्याला हिंदू कालगणनेत अधिक मास असे म्हणतात.
जवळपास सर्वच धर्मातील लोकांनी आपली कालगणना प्रत्येकाशी जुळवून घेतली व त्यात लिप वर्षाची तरतुद केली गेली आहे.
जगात सर्वांत प्रथम इ.स.पूर्व 153 मध्ये नववर्षाची सुरुवात ही 1 जानेवारी पासून मानली गेली.
ख्रिश्चन धर्मातील एक पंथ ईस्टर्न आर्थोडॉक्स मात्र आपल नवीन वर्ष 14 जानेवारी पासून सुरु करतात, ही पध्दत स्विकारणार्‍या देशांमध्ये रुस, जॉर्जिया, येरुशलम आणि सर्बिया यांचा समावेश आहे.
इंग्रजी महिन्यांच्या उत्पत्तीचीही काहणी खूप मजेशीर आहे. याकडे आपण पाहिले तर एक धार्मिक परंपरेचाही समावेश असलेला दिसून येतो.
इंग्रजी नववर्षाचा जो पहिला महिना असतो तो जानेवारी असतो त्याची महती म्हणजे या महिन्याचे नाव हे रोमन देवता जेनसच्या नावावरुन पडले आहे. याच जेनसला लॅटिन भाषेत जेनअरिस म्हटले जाते याचा उच्चार नंतर जानेवारी झाला.
फे ब्रुवारी या महिन्याची उत्पत्ती ही लॅटिन भाषेतील फै बरा वरुन झाली आहे याचा अर्थ शुध्दतेची मेजवाणी असा असून काही जण या महिन्याच्या नावाचा संबंध रोमन देवी फे बरुएरियाशी असल्याचे सांगतात.
मार्च महिन्याचे नाव हे रोमन देवता मार्सवरुन पडले आहे आणि रोमन वर्षाची सुरुवातही याच महिन्यापासून सुरु होते. मार्स हा मार्टिअस या शब्दाचा अपभ्रंश आहे. मार्टिअस म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणे आहे. हिवाळा संपल्यानंतर युरोपमध्ये इतर देशांवर आक्रमण करण्यासाठी सैन्य जे चालत जात असे त्यालाही मार्च असेच म्हणतात.
एप्रिल महिन्याचा इतिहास पाहिला तर एस्पेरायर या लॅटिन शब्दानुसार हा शब्द तयार झाला असून एस्पेरायर म्हणजे उघडणे असा असून या महिन्यातच रोममध्ये झाडांच्या कळ्या उमलून फु ल तयार होते.
मे महिना हा रोमन देवता मरकरीची आई मइयाच्या नावावरुन ठेवण्यात आला. मेचा अर्थ मोठे वृध्द श्रीमंत असा आहे.
युरोपखंडात जून महिन्यात लोक विवाह करुन आपला परिवार स्थापित करतात तर यासाठी लॅटिन शब्द जेन्स असून यालाच पुढे जून म्हटले जावू लागले. त्याच बरोबर अजून एक मान्यता अशी की रोममधील सर्वात मोठा देव जीयस असून त्याची पत्नी जूनो आहे त्यामुळे या महिन्याला तिचे नावही दिले गेले.
जुलै महिन्याचा इतिहास हा रोमन सम्राट जूलियस सीजरशी संबंधीत असून त्यांचा जन्म आणि मृत्यूही याच महिन्यात झाला त्यामुळे त्यांचे नाव या महिन्याला दिले गेले.
रोमन सम्राट जूलियस सीजरचा पुतण्या ऑगस्टस सीजर हा गादीवर आला आणि त्याने आपले नाव इतिहासात कायम राहावे यासाठी सेक्सटिलिस महिन्याचे नाव बदलून ऑगस्टस ठेवले जे पुढे ऑगस्ट म्हणून ओळखले गेले.
सप्टेंबर या महिन्याची उत्पत्ती ही लॅटिन शब्द सेप्टे पासून झाली आहे. खर तर सेप्टेबरचा अर्थ सातवा असा आहे परंतु हा कालगणेत नववा महिना म्हणून ठरला गेला आहे.
ऑक्टोबर महिन्याचे नाव हे आक्ट या लॅटिन भाषेवरुन पडले आहे याचा अर्थ आठवा असा आहे परंतु तो आता दहावा महिना आहे कारण पूर्वी जानेवारी व फे ब्रुवारी हे महिने नव्हते परंतु ग्रेगेरीयन कॅलेंडरमध्ये ते सामिल केले गेल्याने महिन्यांचे सर्व क्रम बदले आहे.
नोव्हेंबर महिना हा तर लॅटिन भाषेत त्याला नववा असे म्हटले जाते परंतु तो आता अकरावा महिना बनला आहे.
डिसेंबर महिन्याला लॅटिन भाषेत डेसेम म्हटले जाते आता हा बारावा महिना बनला आहे.
लेखक डॉ.शामसुंदर रत्नपारखी
बीड.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button