डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केंद्रीय युवा महोत्सवात पारितोषकांचा पाडला पाऊस

छत्रपती संभाजीनगर : केंद्रिय युवा महोत्सावामध्ये चॅम्पियनशिप बरोबर एकूण विविध गटातील 21 पारितोषक जिंकत यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड विद्यापीठाने धमुधडका लावत मराठवाडयातील कलाक्षेत्रावर परत एकदा आपली छाप उमटविल्याचे दिसून आले आहे.
या महोत्सवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने विजेतेपदासह एकूण 21 पारितोषिके जिंकली. ललित कला गटातील सातही कला प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून सांघिक विजेतेपद व प्रा.दिलीप बडे स्मृती चषक जिंकला. या संघास संचालक डॉ.कैलास अंभुरे, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.वैशाली बोधेले, डॉ.गजानन दांडगे, गौतम सोनवणे आदींचे मार्गदर्शन लाभले.
धाराशिव (उस्मानाबाद) उपपरिसरातील संघानेही 8 पातिरतोषिकांसह नाटयगटातील विजेतेपद व जगन्नाथराव नाडापुडे चषक जिंकला. या संघास लोककला विभागप्रमुख डॉ.गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
विभागनिहाय विजेते संघ असे
ललितकला विभाग उत्कृष्ट संघः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
वाड्ःमय विभाग उत्कृष्ट संघः बलभीम महाविद्यालय, बीड.
महाराष्ट्राची लोककला उत्कृष्ट संघः देवगिरी महाविद्यालय.
जगन्नाथराव नाडापुडे नाटयगट चषकः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव (उस्मानाबाद)
डॉ.दिलीप बडे ललित कला चषकः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
डॉ.संजय नवले लोककला चषकः देवगिरी महाविद्यालय.
उत्कृष्ट ग्रामीण संघः शिवाजी महाविद्यालय, कन्नड. उत्कृष्ट संघः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.