किरकोळ भांडणावरून नेकनूरमध्ये युवकावर कुऱ्हाडीने वार

नेकनूर – नेकनूर गावात दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादावरुन एका तरुणांने शिवीगाळ करत दुसर्या तरुणांवर कुर्हाडीने वार करत त्याला गंभीर जखमी केले असून जखमी तरुणांवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा तपास नेकनूरचे पोलिस करत आहेत.
नेकनूर गावात दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एक तरुणाने दुसर्या तरुणांवर कुर्हाडीने डोक्यासह,कपाळ व नाकावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या संभाजीनगर या ठिकाणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेकनूर गावातील सुमित बबन करविले या युवकाने राजाभाऊ रामभाऊ कोकाटेला कुर्हाडीने वार करून गंभीर जखमी केले असून त्याच्यावर संभाजीनगर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाची फि र्याद जखमी राजाभाऊ कोकाटे यांची पत्नी कालींदा राजाभाऊ कोकाटे यांनी नेकनूर पोलिस ठाण्यात दिली असून आरोपी सुमित बबन करविलेच्या विरोधात गुरन 394/2024 कलम 109,118(1)118(2)इछड -2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी फिर्यादी व जखमी हे एकाच गावात राहणारे असून जखमी राजाभाऊ कोकाटे हे गोंधळाच्या कार्यक्रमाला जातो असे आपल्या पत्नी कालींदा कोकाटेना सांगून गावात गेले होते. त्यावेळी गावातील रस्त्यावर काहीतरी कारणावरुन कोकाटे व करविले यांच्यात वाद झाला आणि आरोपी सुमित करविले व राजाभाऊ कोकाटे यांच्यात शिवीगाळ झाली होती. त्या कारणावरून यातील आरोपी सुमित करविलेने लोखंडी कुर्हाडीने राजाभाऊ कोकाटे याच्या डोक्यात वार करुन त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याची फिर्याद कलिंदा कोकाटे यांनी दिली असून या प्रकरणाचा तपास तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी करीत आहेत.