बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण

बीड – बीड शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी संपूर्ण दिवस सूर्यदर्शन झाल नाही आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहिल आहे. यामुळे पिकांवर परिणाम झाला असल्याच बोलल जात आहे आणि थंडी अचानक गायब झाली आहे.
राज्यात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्टयामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे आणि देशात आलेल्या शीतलहरीमुळे यात अजूनच भर पडली आहे. शुक्रवारी बीडसह जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि पावसाची शक्यताही वर्तवली जात होती. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे जनजीवनही विस्कळीत झाले असून थंडीच प्रमाण मात्र अचानक कमी झाल आहे. अश्या या ढगाळ वातावरणात पावसाच्या सरी कोसळतील असे हवामान तज्ञानी सांगितले होते परंतु बीड जिल्ह्यात दुपार पर्यंत पावसाची कोणतीही नोंद करण्यात आली नाही.
राज्यातील काही भागात पावसाच्या सरी
बीड जिल्ह्यात जरी शुक्रवारी पाऊस आला नाही तरी राज्यातील अनेक भागात विशेषतः खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी पावसाच्या सरळी कोसळ्या आहेत त्यामुळे काही प्रमाणात पिकांना याचा फ टका बसला आहे. द्राक्षे, मोसंबी यासह काही पिकांवर याचा परिणाम झाला आहे.