माजी पंतप्रधान मनमोहन सिंहाना दिग्गजांकडून श्रध्दांजली

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान स्व.मनमोहन सिंहना पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह विविध राजकिय पक्षातील नेत्यांनी शुक्रवारी सकाळी श्रध्दांजली अर्पित केली आहे. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी रात्रीला निधन झाले होते, मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्ष होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी दि.26 डिसेंबरला रात्री 9.51 वाजता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एमम्स) मध्ये निधन झाले. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, काँग्रसेच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधीसह काँग्रेसमधील नेते, विविध पक्षातील राजकिय नेत्यांनी डॉ.मनमोहन सिंह यांच्या निवासस्थानी जावून त्यांना श्रध्दांजली अर्पिती केली.
केंद्र सरकारकडून सात दिवसांचा दुखवटा घोषीत
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषीत केला असून या दरम्यान सर्व सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावरती फ डकविला जाईल तसेच सर्व महत्वाचे राष्ट्रीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
काँग्रेसची कार्यकारणी समितीची बैठक रद्द
कर्नाटकातील बेंळगावी येथे गुरुवार पासून काँग्रेस कार्यकारणी समिती (सीडब्यूसी)ची बैठक सुरु होती, परंतु गुरुवारी रात्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याने ही बैठक आता रद्द करण्यात आली आहे.