उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बंगाल व दिल्लीत भूकंपाचे झटके

नवी दिल्ली- भारताच्या शेजारील नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचे झटके उत्तर भारतातील उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व दिल्ली प्रदेशाना जाणवले असून मंगळवारी सकाळी हिवाळ्याच्या दिवसामध्ये या राज्यातील नागरीकांना अजून एका संकटाचा सामना करावा लागला.
नेपाळ-तिब्बत सीमेवरील नेपाळमधील लोबुचे पासून 84 किमी अंतरावरील उत्तर -पश्चिम दिशेला भूकंपाचा केंद्र बिंदू होता. हा भूकंप रिक्टर सेक्लेवर 7.1 चा नोंदविला गेला असून या भूकंपाचे झटके भारतातील उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, बिहार व दिल्लीला जाणवले आहेत. सकाळी जवळपास 6.38 वाजता आलेल्या या भूकंपामुळे कडक थंडीच्या दिवसामध्ये नागरीकांची खूपच परिशानी झाली आहे.
या भूकंपाचे झटके उत्तर प्रदेशातील लखनौ,वाराणशी, भदोही, चंदौली, जौनपुर, गोरखपूरसह इतर ठिकाणी तसेच बिहारमधील राजधानी पाटणासह इतर भागात आणि पश्चिम बंगाल, उत्तराखंड, झारखंड व दिल्लीतही भूकंपाचे झटके जाणवले आहेत.
नेपाळसह भारत, चीन, तिब्बत, भूटान या देशानाही या भूकंपाचे झटके जाणवले आहे परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती बातमी लिहिण्यापर्यंत प्राप्त झालेली नाही.