क्रिकेट न्यूज ः चॅम्पियन्स ट्रॉफि च वेळापत्रक जाहिर, दुबईत रंगणार भारत-पाकिस्तान सामना

बीड – पाकिस्तानमध्ये आयोजीत होणार्या चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफि च वेळपत्र अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने जाहिर केले असून भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याने भारत-पाकिस्तानमधील सामना दुबई येथे 23 फे ब्रुवारी 2025 ला रंगणार आहे.
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफि – 2025 च आयोजन करण्यात येणार आहे परंतु भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याने या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल होत. अखरे अनेक फे रीतील चर्चेनंतर यावर तोडगा काढण्यात आला असून भारत -पाकिस्तानमधील सामने त्रयस्थ ठिकाणी खेळण्यावर दोन्ही देश सहमत झाले यालाच हायब्रिड मॉडेल असे संबोधले गेल आहे.
भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार असून बहुप्रतिक्षीत भारत व पाकिस्तानमधील सामना 23 फे ब्रुवारी 2025 ला दुबईत खेळला जाणार आहे आणि याच बरोबर जर भारत अंतिम सामन्यात पोहचला तर हा सामनाही दुबईत खेळला जाणार आहे.
भारत मागील दहा वर्षापासून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळत नाही आणि दोनीही देशात एकही द्विपक्षीय क्रिकेट मालिकाही खेळली गेली नाही. भारताने सुरक्षच कारण सांगत चॅम्पियन्स ट्रॉफि त सहभागी न होण्याचा निर्णय घेतला परंतु आता हायब्रिड मॉडेलला दोन्ही देशांनी स्विकारल्याने भारत या स्पर्धेत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफि मध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे.
अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझिलँड व बांगलादेश. ब गट- दक्षिण अफ्रि का, ऑस्ट्रेलिया, अफ गाणिस्तान व इंग्लंड.
चॅम्पियन्स ट्रॉफि च वेळापत्रक –
19 फे ब्रुवारी – पाकिस्तान विरुध्द न्यूझिलँड, कराची
20 फे ब्रुवारी – भारत विरुध्द बांगलादेश, दुबई
21 फे ब्रुवारी – अफ गाणिस्तान विरुध्द दक्षिण अफ्रि का, कराची
22 फे ब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड, लाहोर
23 फे ब्रुवारी – पाकिस्तान विरुध्द भारत,दुबई
24 फे ब्रुवारी – बांगलादेश विरुध्द न्यूझिलँड, रावळपिंडी
25 फे ब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुध्द दक्षिण अफ्रि का, रावळपिंडी
26 फे ब्रुवारी – अफ गाणिस्तान विरुध्द इंग्लंड, लाहोर
27 फे ब्रुवारी – पाकिस्तान विरुध्द बांगलादेश, रावळपिंडी
28 फे ब्रुवारी – अफ गाणिस्तान विरुध्द ऑस्ट्रेलिया, लाहोर
1 मार्च – दक्षिण अफ्रि का विरुध्द इंग्लंड, कराची
2 मार्च – भारत विरुध्द न्यूझिलँड, दुबई
3 मार्च – पहिला उपात्य सामना, दुबई
5 मार्च – दुसरा उपात्य सामना, लाहोर
9 मार्च – अंतिम सामना लाहोर किंवा दुबई पैकी एका ठिकाणी
