ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्रिपद अन् नाशिकमध्ये पालकमंत्रिपदासाठी चढाओढ; भुजबळ, महाजन, भुसे शर्यतीत, कुंभमेळ्यामुळे विशेष महत्त्व!

नाशिक : राज्याचा नवा मुख्यमंत्री काेण? यावर एक मत हाेत नसतानाच, नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ सुरु झाली आहे. मावळते पालकमंत्री दादा भुसे आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत. दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा या पंचवार्षिकमध्ये येत असल्यानं हजाराे काेटींची विकासकामे शहरात हाेणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकचे नाव जागतिक पातळीवर चर्चिले जाणार असल्यानं नाशिकच्या पालकमंत्रीपदाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.


नाशिक विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रत्येक पक्ष आणि मातब्बर नेते आपापल्या पद्धतीने वजनदार मंत्रिपदासाठी लाॅबिंग करत आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी महायुतीने 14 जागा लढविल्या हाेत्या आणि सर्व जागा विजयी झाल्यानं सर्व पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुंबई, पुणे पाठाेपाठ महत्वाचे शहर म्हणून नाशिककडे बघितले जात असल्याने नाशिकचा पालकमंत्री हाेण्यासाठी कायमच रस्सीखेच बघायला मिळते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री भूषविले आहे. 2014 मध्ये \डणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्र देण्यात अली हाेती. याच काळात नाशिकमध्ये कुंभमेळा भरला हाेता. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा सुनियाेजितपणे पार पडला हाेता. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळातच देवेंद्र \डणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावर आगामी 2027 च्या कुंभमेळाची जबाबदारी दिली आहे.


पदाधिका-यांकडून लाॅबिंग
अडीच वर्षांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यावेळी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली हाेती. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची पाॅवर वापरून दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री केले हाेते. त्यामुळे आता पुन्हा एकदा या तिन्ही पालकमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आपापल्या पद्धतीने लाॅबिंग करत आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेचे दाेन आमदार असतानाही दादा भुसे याना मंत्रिपद देण्यात आले हाेते. मागील अडीच वर्षात मुख्यमंर्त्याच्या नेतृत्वाखाली दादा भुसे यांनी आपल्या कामाची माेहर उमटविली आहे. त्यामुळे शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळेल, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत असतानाच भाजपचे गिरीश महाजन यांनी कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्रीपदावर केलेल्या कामाची आठवण करून देत आहेत.


राष्ट्रवादीचा पालकमंत्रीपदावर अधिकार असल्याचा दावा
नाशिकचे विमानतळ, मुंबई-नाशिक महामागार्वरील उड्डाणपूल अशी विविध कामे छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास आल्यानं कुंभमेळाचे नियाेजनही त्यांनाच देण्यात यावे, अशी राष्ट्रवादीकडून मागणी हाेत आहे. यंदाच्या निवडणुकीत 7 जागा जिंकत जिल्ह्यातील सर्वात माेठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं राष्ट्रवादीचा पालकमंत्रीपदावर अधिकार असल्याचा दावाही केला जात आहे.


काेणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
नाशिकमध्ये यंदा मंत्रिपदासाठी स्पर्धा सुरु आहे. चांदवडचे आमदार राहुल आहेर यांना कॅबिनेट मंत्री करण्याचा शब्द स्वत: देवेंद्र \डणवीस यांनी जाहीर सभेत दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे सलग तिस-यांदा विधानसभेत पाेहचले आहेत. सिन्नरचे आमदार माणिकराव काेकाटे हे देखील मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच मंत्रिपदासाठी दावेदारी वाढली असून काेणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button