दिगंबर कुंडलकर यांना राज्यस्तरीय गुणिजन गौरव आदर्श सहकारी संस्था सेवारत्न पुरस्कार प्रदान

बीड – बीड येथील सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण करणारे दिगंबर कुंडलकर यांना मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय गुणिजन गौरव आदर्श सहकारी संस्था सेवारत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
पुणे येथे दि.18 डिसेंबर रोजी मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय गुणिजन गौरव आदर्श सहकारी संस्था सेवारत्न पुरस्कार दिगंबर कुंडलकर यांना प्रदान करण्यात आला.
मागील दहा वर्षापासून दिगंबर कुंडलकर हे सहकार क्षेत्रातील संस्थांचे लेखापरिक्षण करुन देण्याचे काम करत असून या आधी त्यांनी एका नागरीक सहकारी पतसंस्थेमध्ये व्यस्थापकपदावर वीस वर्ष सेवा केली आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुटुंबातील तसेच नातेवाईक, मित्र परिवार आणि पूर्णवाद परिवार, विश्वकर्मा परिवार, विविध सामाजीक संघटना, वारकरी संघटनेने त्यांचे अभिनंदन केले. वृत्तपर्व परिवाराकडूनही त्यांचे हार्दिक अभिनंदन.
