पुण्यातील पुस्तक मेळाव्यात डॉ.अविनाश कुलकर्णी लिखीत पेणचे गणपती पुस्तकास वाचकांचा उत्स्फू र्त प्रतिसाद
पुणे – पुण्यात नुकतच्या झालेल्या राज्यस्तरीय पुस्तक प्रदर्शनामध्ये अर्थतज्ञ डॉ.अविनाश कुलकर्णी लिखीत पेणचे गणपती या पुस्तकाला वाचकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे
.
पुण्यातील फ र्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर दि.19 डिसेंबरला भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रंथ प्रदर्शनात असंख्य लेखकांनी लिहिलेले पुस्तके व साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. पुण्यातील वाचकांनीही या प्रदर्शनाला मोठया उत्साहाने प्रतिसादही दिला. या पुस्तक प्रदर्शनात अर्थतज्ञ डॉ.अविनाश कुलकर्णी यांनी लिहिलेले पेणचे गणपती या पुस्तकासही वाचकांनी पसंती दिली.
सुनिधी पब्लिशर्स प्रकाशीत डॉ.अविनाश कुलकर्णी यांचे हे पुस्तक या ग्रंथप्रदर्शनात स्टॉल क्र.8 मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. पेण येथील शाडूचे गणपती हे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असून या गणपती मूर्ती बनविण्याच्या व्यवसायावर आधारीत होणारा आर्थिक व्यवसाया संबंधीचे लेखन या पुस्तकात करण्यात आले आहे.


