नवनीत कॉवत बीड जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षक

बीड – नवनीत कॉवत यांची बीड जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती केली असून ते 2017 च्या भारतीय पोलिस सेवा बॅचचे अधिकारी आहेत.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्य सरकारवर चौहबाजूने टिका होवू लागली होती. त्याच बरोबर बीड जिल्ह्यातील आमदारांनीही विधानसभेत या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होते, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन देताना वर्तमान जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य गृहविभागाने नवीनत कॉवत यांची बीड जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती केल्याचा आदेश प्रसिध्द केला.
नवनीत कॉवत हे 2017 च्या भारतीय पोलिस सेवेच्या बॅचचे अधिकारी असून ते सध्यात पोलिस उप आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. अविनाश बारगळ यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाने सांगितले आहे.