संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात – एकनाथ शिंदे

नागपूर – संंघ मुख्यालय रेशीमबागमध्ये मी पहिल्यांदा आलेलो नसून यापूर्वी देखील आलो आहे आणि लहानपणापासून संंघ परिवाराशी माझ नात आहे. संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात झाली आणि त्यानंतर शिवसेनेच्या शाखा व शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण सुरु झाली असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
नागपूर येथील संघ मुख्यालय रेशीमबाग येथे गुरुवारी नवनिर्वाचित महायुतीच्या आमदारांचा बौध्दीक वर्ग आयोजीत केला होता. या वर्गासाठी भाजप व शिवसेना शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, संघाची स्थापना 1925 ला डॉ.हेडगेवार यांनी केली असून पुढील वर्षी संघ स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे आहेत आणि निरपेक्ष भावनेने काम कसे करावे हे संघाकडून शिकाव.