संसदेतील धक्का बुक्कीत भाजपचे खासदार सारंगी व राजपुत जखमी

नवी दिल्ली – संसद परिसरात सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनाच्या दरम्यान झालेल्या धक्का बुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे आणि या धक्का बुक्कीचा आरोप त्यांनी लोकसभेतील विरोधीपक्ष नेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर केला आहेे.
संसदेत जाण्यासाठी खासदारांसाठी असलेल्या गेटपाशी भाजप व मित्रपक्षांचे खासदार जमा झाले व ते विरोध प्रदर्शन करत असतानाच काँग्रेसचे नेते राहूल गांधी व इतर खासदार संसदेत जात असतानाच दोन्ही पक्षातील खासदारांमध्ये धक्क ा बुक्की झाली व त्यात भाजपचे दोन खासदार ओडीशातील बालासोरचे खासदार प्रताप सारंगी व फ र्रुखाबादचे खासदार मुकेश राजपूत जखमी झाले आहेत. या दोन्ही जखमी खासदारांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले आहे. मुकेश यांची स्थिती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
भाजपच्या खासदारांना धक्का बुक्की केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर करण्यात आला आहे. तर राहुल गांधीनी स्पष्ट केले की भाजपच्या खासदारांनी मला संसदेत प्रवेश करण्यापासून रोखले व धमकावत धक्का-बुक्की केली.
दुसरीकडे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजूनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की राहुल गांधी विरोधीपक्ष नेते आहेत व त्यांना पैहलवानी दाखविण्याची काय जरुरी आहे.
केंद्रीय मंत्र्यांची रुग्णालयाकडे धाव व सारंगी व राजपुतांच्या तब्यतेची विचारपूस
संसदेत झालेल्या धक्का-बुक्कीमध्ये जखमी झालेले खासदार सारंगी व राजपूत यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळताच केंद्रिय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद जोशी व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रुग्णालयात जावून दोन्ही खासदारांची भेट घेतली व त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली.