अनिल अंबानीच्या रिलांयस पॉवरला सौर ऊर्जाचा सर्वांत मोठ प्रोजेक्ट

नवी दिल्ली – मागील काही वर्षापासून प्रसिध्दी माध्यमांपासून दूर गेलेले व ऐककाळचे दिग्गज उद्योगपती राहिलेले अनिल अंबानींच्या रिलायंस पॉवर कंपनीला सौर ऊजा र्क्षेत्रातील सर्वांत मोठ कॉन्ट्रॅक्ट मिळाल असून हा प्रोजेक्ट भारतासह आशिया खंडातील सर्वांत मोठा प्रोजेक्ट आहे.
रिलांयस उद्योग समुहाच्या विभाजनानंतर पॉवर सारख क्षेत्र अनिल अंबानीना मिळाल आणि त्यांचे अनेक प्रोजेक्टही चालू आहेत. भारत सरकारच सौर ऊर्जा क्षेत्रातील एक मोठ प्रोजेक्ट मंगळवारी त्यांच्या कंपनीला मिळाल आहे. रिलांयस पॉवरची उपकंपनी रिलांयस एनयू सनटेक प्राव्हेट कंपनीला भारत सरकारची कंपनी सोलर एनर्जी कॉरर्पोरशन ऑफ इंडिया (एसईसीआय) ने हा प्रोजेक्ट दिला आहे.
या प्रोजेक्ट अंतर्गत 930 मेगाव्हॅटचा सोलर प्लँट आणि 465 मेगाव्हॅट अर्थात 1860 मेगाव्हॅट तास चालणारी बॅटरी स्टोरेज सिस्टिम उभारणी सामिल आहे.
दोन हजार मेगाव्हॅट इंटरस्टेट ट्रॉसमिशन सिस्टिमशी संबंधीत असलेल्या सोलर पॉवर प्रोजेक्ट आणि एक हजार मेगाव्हॅट/ चार हजार तास ऊर्जा साठविण्याची क्षमता असलेल्या या प्रोजेक्टसाठी 5 कंपन्यांनी टेंडर भरलेले होते. परंतु यातील सर्वात मोठा भाग हा अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायंस पॉवरला मिळाला आहे.
एसईसीआय रिलायंस एनयू सनटेक बरोबर सोलर ऊर्जा खरेदीचा 25 वर्षाचा करार करणार आहे आणि यातून मिळणारी वीज एसईसीआय डिस्कॉम्सला विकणार आहे.
