एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर करण्यासाठी मतदानाद्वारे मंजूरी
नवी दिल्ली – एक देश एक निवडणूक संंबंधीचे 125 वे राज्यघटना विधेयक केंद्रिय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत मंगळवारी सादर केले. परंतु विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतल्याने हा प्रस्ताव सादर करायचा की नाही यावर लोकसभेत मतदान झाले आणि बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाल्याने हे विधेयक आता चर्चेला येणार आहे.
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी विधेयकांपैकी एक असलेले एक देश एक निवडणूक विधेयक अखरेकार दि.17 डिसेंबरला मंगळवारी लोकसभेत सादर करण्यात आले. विरोधकांनी मात्र यावर आक्षेप घेतल्याने हे विधेयक चर्चेसाठी सादर करावे की नाही यासाठी सभागृहात मतदान घेण्याची मागणी करण्यात आली आणि अध्यक्षांनी याला स्विकारले.
विधेयकांवर ईलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राद्वारे सभागृहात मतदान घेण्यात आले. मतदानाच्या आधी लोकसभा सचिवांनी मतदान प्रकिया संबंधीची माहिती हिंदी व इंग्रजीतून दिली. त्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले आणि प्रस्तावाच्या बाजूने 220 आणि विरोधात 149 मते पडले परंतु विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर ज्यांना आपल्या मतामध्ये बदल करायचा आहे त्यांना चिठ्ठीवर मतदान करण्यास अध्यक्ष बिर्लानी मान्यता दिल्यानंतर सुधारीत मतदानंतर प्रस्तावाच्या बाजूने 269 आणि विरोधात 198 मतदान झाले. मतविभाजनानंतर बहुमातने हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी मांडण्यास मान्यता दिली. यानंतर केंद्रिय मंत्री मेघवाल यांनी सभागृहात हे विधेयक मांडले.
