दिल्ली विधानसभा रणसंग्राम ः आप पाठोपाठ काँग्रेसच्या 21 उमेदवारांची पहिली यादी घोषीत
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणूकीचा रणसंग्राम जानेवारी महिन्यात होणार असून आम आदमी पार्टी पाठोपाठ काँग्रेसने आपल्या 21 उमेदवारांची पहिली यादी घोषीत करुन दिल्ली विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचे संकेत दिले आहेत तर भाजप मात्र अजूनही यात मागे पडला आहे.
काँग्रेस पक्षाने गुरुवारी दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी 21 उमेदवारांची पहिली यादी घोषीत केली असून यात सर्वांच लक्ष वेधले ते नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसने संदीप दीक्षित याना उमेदवारी दिली असून या मतदारसंघातून आपचे प्रमुख संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथून निवडून येतात परंतु आपने आता पर्यंत त्यांच्या उमेदवारीची येथून घोषणा केली नाही.
याच बरोबर काँग्रेसने दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांना बादली, माजी मंत्री हारुन यूसुफ ना बल्लीमारान आणि चौधरी अनिल कुमार यांना पडपडगंज येथून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने घोषीत केलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे.
अरुणा कुमारी – नरेला, मंगेश त्यागी – बुराडी, शिवांक सिंघल- आदर्शनगर , देवेंद्र यादव – बादली, जय किशन – सुलतानपुर माजरा (एससी), रोहित चौधरी – नांगलोई जाट, प्रविण जैन – शालीमारबाग, रागिनी नायक – वजीरपुर, अनिल भारद्वाज – सदर बाजार, मुदित अग्रवाल – चांदणी चौक, हारुन युसूफ – बल्लीमारान, पी.एस.बावा – टिळकनगर, आदर्श शास्त्री – द्वारका, संदीप दिक्षीत – नवी दिल्ली, अभिषेक दत्त – कस्तूरबानगर, राजिंदर तंवर – छतरपुर, जय प्रकाश – आंबेडकर नगर एससी, गविंत सिंघवी – ग्रेटर कैलास, अब्दुल रहमान – सीलमपुर, अली मेहंदी – मुस्तफ ाबाद .