बीड जिल्ह्यात बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी/ नुतणीकरण पुर्ववत करा – कृती समिती

बीड – इमारत बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्वी कामगार स्वता: करीत होता ती पुर्ववत करा यासह इतर मागण्यांसाठी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर कृती समितीच्या अध्यक्षपदी राजकुमार घायाळ यांची निवड एकमुखाने करण्यात आली, कृती समितीच्या बाकी पदाधिकार्यांची निवड सर्व संघटनाना विश्वासात घेवून करण्यात येणार आहे.
बीड शहरातील हमाल भवन जुना मोंढा बीड येथे आयोजीत बैठकीत जिल्हातील बांधकाम कामगार संघटना मोठया संख्येने सहभागी झाल्या. यावेळी येणर्या अडचणी बाबत अजीत मोरे, शेख सादेक,मैनूद्दिन शेख, अझर सिदीकी, कॉ.सादेक पठाण, रवि मुडेगावकर, शेख मुनाफ, शेख युनूस, प्रतिक राऊत, भारत देशमाने, विठ्ठल खेत्रे, राजु भोले, कॉ.बी.जी.खाडे, नवीद खान, शेख रहीमभाई, समीर शेख, इम्रान फारोकी, गणेश वीर यांनी बांधकाम कामगारांच्या अडचणी व मंडळाकडून होणारी फसवणूक याबाबत सविस्तर चर्चा केली व पुढील विषयावर जिल्ह्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण पुर्ववत करावी, गेल्या काही कालावधीत बीड कार्यालयात बोगस पद्धतीने नोंदणी केलेल्या कामगार नोंदणीसाठी संबंधीताना निलंबीत करुन चौकशी करणे, आणि गुन्हे दाखल करावेत, लाभाचे प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व संबधीतावर कारवाई करणे,कामाचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी कंत्राटदार मिस्त्री व मुकादामना चौकशी करुन नियोक्ता प्रमाणपत्र देण्याबाबत तात्काळ कारवाई करावी या व इतर मागण्यासाठी जिल्हयातील संघटनानी एकत्रीत रित्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शेरजमा खान पठाण यांनी सर्वांचे आभार मानले रामभाऊ बादाडे यांनी प्रस्ताविक केले.