व्यायाम करण्यापूर्वी
थंडीच्या दिवसांमध्ये व्यायाम सुरु करणार्यांची लाट येते. मात्र उत्तम आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम करत राहणं गरजेचं आहे. आहारासोबत व्यायामाचं योग्य गणित जमवल्यास तुम्ही उत्तम आरोग्य राखण्याचं ध्येय गाठू शकता. त्यात सातत्य गरजेचं आहे. व्यायाम करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.
बरोबर पाण्याची बाटली ठेवणे आवश्यक.
जीमचे ड्रायफि टचे कपडे घालावेत तसेच पायात स्पोर्टस शूज घालावेत.
कोणत्याही व्यायामात सातत्य लागते, हे आधी लक्षात घ्या.
ट्रेनरने योग्य प्रशिक्षण घेतले आहे ना, याची खात्री करुन घ्या.
वजन वाढवताना आधी आपल्या शरीराची क्षमता किती आहे, याचा विचार करा.
जीममध्ये अधिक वजनाचे व्यायाम करायचे असतील, तर बेल्ट आणि नी कॅपचा वापर करा.
जीममध्ये जाणार असाल, तर कोणते व्यायामप्रकार आपल्या शरीरासाठी योग्य ठरतील, याची ट्रेनरकडून माहिती करुन घ्या. चालण्यासाठी बागेत जात असाल, तर आपण किती वेळात किती अंतर चालत आहोत, याची नोंद ठेवा आणि ते वाढवत न्या.

सई तापीकर, फि टनेस एक्सपर्ट,पुणे.ं