सामाजिक कार्यकर्ते सुभाष ऊर्फ रविभाई नाथभजन यांचे दु:खद निधन

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
येथील सुभाष ऊर्फ रविभाई नाथभजन (54), रा. संजयनगर मुकुंदवाडी यांचे 6 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभाष ऊर्फ रविभाई नाथभजन यांच्या पश्चात पत्नी,2 मुली 2 मुले असा परिवार आहे.
मनमिळावू स्वभावामुळे अनेक माणसे जोडली…
रविभाई हे स्वभावाने अत्यंत चांगले होते, त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी असंख्य मित्र आणि जवळची माणसे जोडून ठेवली होती. सामाजिक कार्यात त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांनी अनेकांना मदत केली होती. आपल्या कार्याची प्रसिद्धी कधी त्यांनी केली नाही. त्यांच्या स्वभावातील अत्यंत साधेपणा अगदी शेवटपर्यंत टिकून होता.
त्यांच्या अकस्मीक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून त्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ते रिपब्लीकन पार्टीचे काम ते पहात होते. सामाजिक कार्यकर्ते सचिन रूपवते यांचे ते मामे भाऊ होते.
प्रा. जोगेंद्र कवाडे, ज्येष्ठ नेते जे के नारायण सर यांनी केले दु:ख व्यक्त
समाजातील मोठे नेते, माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर , जेके नारायण हे त्या पार्टी यांनी रविभाईंच्या निधनाचे वृत्त कळताच हळहळ व्यक्त केली. अत्यंत सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता गमावलला असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. काल ज्येष्ठ नेते जे के नारायण सर यांनी नाथभजन कुटूंबियांचे भेट घेऊन धिर दिला. तर माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे लवकरच नाथभजन कुटूंबियांची भेट घेणार आहेत.