गेवराईमध्ये 3 ते 7 जानेवारी पर्यंत भव्य कृषी प्रदर्शन व कृषी महोत्सवाचे आयोजन

गेवराई ( प्रतिनिधी ) मराठवाड्यातील शेतकर्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने गेल्या 16 वर्षांपासून किसान कृषि विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय कृषिरत्न गणेशराव बेद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि.3 ते 7 जानेवारी दरम्यान किसान कृषी महोत्सवात बीड रोड वरील आठ एकर विस्तारणी दसरा मैदानात भव्य अशा 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू असून शेतकर्यांंमध्ये कृषी प्रदर्शनाची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे दि. 27 शुक्रवार रोजी दसरा मैदान येथील मैदानावर डोम स्ट्रक्चरच्या कामाचा शुभारंभ गेवराईचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर व पत्रकार मधुकरराव तोर, पोलीस उपनिरीक्षक जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक भुतेकर, विनोद नरसाळे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शिनु भाऊ बेदरे, भागवत जाधव, विनोद पौळ, मुस्ताक राज, संभाजी जाधव, आदी मान्यवरांच्या
उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला भव्य असे सहा डोम या ठिकाणी उभारण्यात येत असून या अनुषंगाने विविध कार्यक्रमाची रेलचेल चार दिवस चालणारा असून दिनांक 03 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे असल्याची माहिती रोजी कृषी प्रदर्शन आयोजन समितीचे संयोजक कृषिभूषण महेश बेदरे यांनी माहिती आहे.
मराठवाड्यातील शेतकर्यांना नवतंत्रज्ञान मिळावे म्हणून येथील किसान कृषी विकास प्रतिष्ठान मराठवाडाभर बीड, जालना, परभणी, हिंगोली सह इतर ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करते स्वर्गीय कृषिरत्न गणेश बेद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदर्शनाचे आयोजन केले असून प्रकल्प संचालक आत्मा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, महाएपीएसी फेडरेशन यांचा यात विशेष सहभाग प्रदर्शनात असणार आहे.
कृषी प्रदर्शनात भव्य अशा आठ दालनात द्वारे तब्बल 200 कृषी उत्पादनांची स्टॉल यामध्ये असून कृषी अवजारांची प्रात्यक्षिके या प्रदर्शनात पाहण्यास मिळणार आहे, एकदिवसीय पशुप्रदर्शन तज्ज्ञांची चर्चासत्रे आदी उपक्रम या प्रदर्शनात होणार आहे.
विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन व समारोप प्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा या शेतक यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाचा गेवराई शहरासह जिल्ह्यातील शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने संयोजक कृषिभूषण महेश बेदरे ,स्वागताध्यक्ष भाऊसाहेब नाटकर , निमंत्रक शिनु भाऊ बेद्रे , कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, स्वागत समिती प्रमुख राजेंद्र बेदरे ,
पुरस्कार समिती प्रमुख राजेंद्र आतकरे, मान्यवर स्वागत समिती प्रमुख राजेंद्र मोटे,नियोजन समिती अशोकराव भाबड,व्यवस्थापन समिती प्रमुख बाळासाहेब आतकरे ,प्रसिद्धी प्रमुख भागवत जाधव ,विनोद नरसाळे पोळ ,चर्चासत्र समितीप्रमुख सतीश केसभट, व्यवस्थापक समिति राजाराम पवार, पशुप्रदर्शन समिती प्रमुख संभाजी जाधव आदींनी केले आहे.
