आज फडणवीस मुख्यमंत्री व शिंदे, पवार उपमुख्यमंत्री पदाची घेणार शपथ

बीड – भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर गुरुवारी देवेंद्र फडणवीस सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर त्यांच्या बरोबर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाल्यानंतर महायुतीला प्रचंड असे यश मिळाले आहे आणि सरकार महायुतीचे स्थापन होणार हे निश्चित झाले होते परंतु सरकार स्थापनेच्या चर्चा लांबत गेल्यानंतर महायुतीचे सरकार कधी स्थापन होणार याची चर्चा सुरु होती.
4 डिसेंबरला भाजपचे केंद्रिय पर्यवेक्षक केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीमध्ये भाजप विधीमंडळाची बैठक झाली आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाली. दुपारी तिनीही पक्षांच्या नेत्यानी राज्यपालांची भेट घेवून सरकार स्थापनेचा दावा सादर केला व राज्यपालांनी त्यांना गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता शपथवधीची वेळ दिली आहे.
आझाद मैदानावर होणार्या या भव्य शपथवधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील विविध मंत्री, भाजप व मित्रपक्ष राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संत-महंत आणि लाडक्या बहिणीही उपस्थित राहणार आहेत.