बीडसह जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, शेतकरी चिंतीत

बीड – तामिळनाडू राज्यात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे सध्या महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी रविवारी व सोमवारी ढगाळ वातावरण होते आणि त्यामध्येच थंडीही जाणव होती.
तामिळनाडू राज्यात आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रावरही जाणवला असून रविवारी व सोमवारी असे दोन दिवस बीड जिल्ह्यातही ढगाळ वातावरण होते, जिल्ह्यांमध्ये यामुळे अनेक पिकांना याचा फटका बसेल असे बोलले जात असल्याने शेतकरी चिंतेत दिसून आला आहे.
रविवारी व सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे धुक्याचे प्रमाणही वाढले होते. सकाळी थंड वातावरण होते परंतु दुपारीही सूर्यदर्शन झाले नसल्याने वातावरणात गारठा कायम राहिला.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सूर्य दर्शन झाल्याने दोन दिवसाचे ढगाळ वातावरण निवळले, तरीही काही ठिकाणी थंड वातावरण व मधूनच ढगाळ वातावरण दिसून आले. या ढगाळ वातावरणाचा परिणाम अनेक पिकांवर आणि फळबागांवरही दिसून आला आहे. यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत येईल असे बोलले जात आहे.