बीडमध्ये रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव
बीड, – क्रीडा व युवक सेवा संचालनालय व बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 04 ते 05 डिसेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी यामध्ये सहभागासाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 02 डिसेंबरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत बीड येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल इमारत येथे सादर करून महोत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, तालुका क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण यांनी केले आहे. मुदतीनंतर येणारे व स्पर्धेच्या दिवशी वेळेवर येणारे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.